प्रिय व आदरणीय बाप्पा
तुमच्या येण्याने सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरते. दहा दिवस नुसती धमाल असते. तुमच्याकडे काही मागायचे आहे. आता कलियुग सुरु झाल्याने पूर्वी कधी नव्हती एवढी जास्त तुमच्या आशीर्वादांची गरज भासू लागली आहे !
प्रत्येकालाच सुखाचा सदरा हवा असतो .पण मग त्या गरीब बिचाऱ्या दु:खाना कोण आपलेसे करणार ?दु:ख हा तर जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे ते सहन करण्याची ताकद आणि धॆर्य तुम्ही आम्हाला द्या .
प्रत्येकजणच पाठीमागे काही तरी मागे लागल्याच्या आविर्भावात पळतो आहे. पैसा कितीही मिळाला तरी तो कमीच पडतो आणि आयुष्यातला खरा आनंद तर खूप छोट्या छोट्या गोष्टीत सामावलेला आहे ह्याची पुन्हा एंकदा तुम्ही आम्हाला आठवण करून द्या .
आमच्या लहानग्यांना छान आनंदाने ,स्वछंदी मानाने जगू दे. आमच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर लादण्याची घोडचूक आमच्या हातून नको होऊ दे !
बाप्पा ,तुमचे नाव "गणपती " . तुमच्या नावातच "ती" सामावली आहे. पण २०१३ मधली "ती" सुरक्षित नाही राहिली हो ! संकट समयी द्रोपदीला तिच्या भावाने ,कृष्णाने मदत केली होती . आत्ताच्या द्रौपदिंना मात्र स्वत:च सामर्थ्यवान ,निर्भय बनावे लागणार आहे. कारण दुर्देवाने त्यांच्या मदतीला कोणीच नाही .
"काय नाही" याचाच विचार आम्ही एवढा करतो कि जे आहे,त्याचे महत्व,त्याचा आनंद घ्यायलाच विसरतो. आहे त्यात आनंद, समाधान मानून मग अजून पुढे कसे जाता येईल याचे भान आम्हाला असू दे !
जमाना बदलला ,लोक बदलले पण बाप्पा नात्यांमधला ओलावा नको हो बदलायला ! use and throw आणि disposable च्या या जमान्यात माणसाच्या basic नैतिक मूल्यांचा नको हो ऱ्हास व्हायला !
कधी कोणे एके काळी सामर्थ्यवान,समृध्द अशा असणाऱ्या आमच्या या भारताला आज जात,धर्म ,भ्रष्ट राजकारणी , अंधश्रद्धा अशा आणि इतर अनेक व्याधींनी ग्रासले आहे. भारताची शान आणि जान असणाऱ्या आजच्या ह्या आमच्या तरुण पिढीला डोळे उघडे ठेवून सद सद विवेक बुद्धीने वागण्याची शक्ती तुम्ही द्या !
sorry ,खूप काही मागते आहे. जग बदलणे अवघड आहे. पण मी माझ्या परीने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतीये …………………….
गणपती बाप्पा मोरया
Morya
ReplyDeleteGanapati Bappa Moraya
ReplyDelete