लहाणपणापासून वाचनाची प्रचंड आवड ! कितीही मित्र मैत्रीण झाले,होतील तरी पुस्तके आयुष्यभर साथ देणारे खरे सोबती वाटतात . या पुस्तकांनीच मला घडवले,शिकवले,आणि मी आयुष्याकडे नव्या दृष्टीकोना तून बघायला लागले आणि कधी मधी वाटणारा मनाचा एकटेपणा पण यांनीच दूर केला.
मी स्वत feminist असल्याने कर्तबगार स्त्रियां बद्दलची पुस्तके वाचायला खूप आवडते. आता अर्थातच दोन मुले,घरच्या जबाबदाऱ्या यात वाचायला वेळ कमी मिळतो, पण २०१२ मध्ये जे वाचन झाले ,यातली दोन पात्रे मनात घर करून राहिली!
एलेनॉर रूझवेल्ट - केवळ अमेरिकेच्या प्रेसिडेंटची पत्नी एवढेच माहित होते त्यांच्या बद्दल.म्हणून कुतुहलतेने पुस्तक घेतले. अत्यंत लाजरे-बुजरे आणि दिसायला सर्व सामान्य असे त्यांचे व्यक्तीमत्व ! त्यांचे लहानपण आणि तरुणपण आत्मविश्वासाचा अभाव आणि आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत या कमतरतेच्या जाणीवेत गेले, पण " पाण्यात पोहताना चोरूनिया क्षणिक त्याचे त्यालाच कळले तो राजहंस एक " या उक्ती प्रमाणे स्वताला कुरूप वेडे पिल्लू समजनाऱ्या या एलेनॉरला स्वताच्या राजहंसपणाची जाणीव लंडन मध्ये गेल्यावर झाली.
खूप यश,पैसा,प्रसिध्दी मिळवलेल्या या स्त्रीचे आत्मचरित्र वाचताना मला काय भावले तर ते तिचे वेगळेपण. आयुष्यभर तिला जे पटले, योग्य वाटले तेच तिने केले.आणि समाज ,रूढी यांच्या प्रभावात न राहता सद्सद्विवेक बुद्धीने स्वताचे आयुष्य जगली. दुखी,एकाकी लहानपण ,लग्नातील फसवणूक,dominating सासू,आणि सतत येणारे depression यात ती रडत न बसता यातून मार्ग काढला."फर्स्ट लेडी" काय असते हे तिने जगाला खर्या अर्थाने दाखवून दिले,१९३३ च्या त्या जमान्यात ज्या वेळेस पार्टीसाठी sandwiches कुठल्या प्रकारची बनवायची , कुठला इवेन्ट कधी अरेंज करायचा ,नवऱ्याला त्याच्या कामात मदत करायची, आणि एक 'ग्रेट होस्ट 'म्हणून सगळीकडे मिरवायचे एवढेच त्या फर्स्ट लेडीचे काम ! पण एलेनॉरनी प्रत्येक वेळेस स्वतंत्र ओळख निर्माण केली. पोलिटिक्स हे फक्त पुरुषांचे कार्यक्षेत्र समजल्या जाणाऱ्या त्या वेळेसच्या जमान्यात त्या मात्र आघाडीने पाय रोवून समर्थपणे उभ्या होत्या.गरिबांसाठी न्याय,सर्वाना समान वागणूक यासाठी त्या आयुष्यभर झगद्ल्या ,आणि आपल्या लेखणीने आणि कृतीने जेवढे करता येईल तेवढे करत होत्या.आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत न थकता, न कंटाळता दुसऱ्याचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
कुठल्याही भेदभावाविरुद्ध ठामपणे त्या उभ्या राहिल्या.आणि केवळ अमेरिकेलाच जग न मानता जगभरात जेवढे जाता येईल आणि ज्या देशातून जे चांगले आहे, त्या देशातून ते घेवून अमेरिकेला समृध्द करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
दुसरे व्यक्तिमत्व मनाला भावते ते Anne Frank चे .तिच्या डायरीने ती जगप्रसिध्द झाली.तिच्या तेराव्या वाढदिवसाला भेट दिलेली ती डायरी जी तिच्या आयुष्यातल्या दोन वर्षांबद्दलची माहिती सांगते ,आज जगभरात अनेक नाटके आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिदध झाली आहे.तेराव्या वर्षाच्या मुलीचे भावविश्व,तिच्या आवडीनिवडी,तिची स्वप्ने,आणि तिच्या आयुष्याकडून अपेक्षा ..............................तिची डायरी वाचताना नकळतपणे या गोष्टी उलगडत जातात.सिक्रेट anex मधले तिचे आयुष्य.तिला वाटणारी भिती ,तिथले तिचे अनुभव ,आणि आजुबाजूला प्रचंड कोलाहल असतानाही ,आयुष्य भयाण अवस्थेत असतानाही तिला वाटणारा दुर्दम्य आशावाद , आणि आयुष्याकडे बघण्याचा तिचा positive दृष्टीकोन !
"कुठल्याही परिस्थितीत ,काहीही झाले तरी लोक मनाने चांगले असतात", " घाबरलेल्या ,दुखी ,एकाकी लोकांसाठी उत्तम उपाय म्हणजे - अशा शांत ठिकाणी जाणे जिथे ते निसर्गाशी आणि देवाशी एकरूप होतात .कारण त्याचवेळेस त्यांना प्रत्येक गोष्ट जशी पाहिजे तशीच आहे असे वाटू लागते .................ही आणि अशी अनेक वाक्ये तिच्या विचारातली machurity दाखवतात .तिच्यातल्या कोवळ्या वयातला निष्पाप निरागसपणा आणि त्याचवेळेस आयुष्यातल्या परिपक्वतेकडे जाणारा तो विलक्षण प्रवास ................
तिची कहाणी वाचताना जाणवते कि एक मिलियन पेक्षा जास्त मृत्यू पावलेल्या ज्युईश मुलांचे जणू काही ती नेतृत्वच करत होती. आपल्या मनातल्या भावना समर्थपणे आणि निर्भयपणे मांडणे सर्वांना जमतेच असे नाही,विशेषतः इतक्या लहान वयात तिला ते कौशल्य प्राप्त झाले होते ते कौतुकास्पद आहे .
वेगळ्या वयातल्या, वेगळ्या देशाच्या या स्त्रियान बद्दल वाचताना जाणवते ते त्यांचा आत्मविश्वास, स्वतः च्या मतांशी ठाम राहण्याची वृत्ती आणि मुख्य म्हणजे आशावादी दृष्टीकोन !
अनुकूल परिस्थिती मध्ये तर सर्वचजण पुढे जातात,पण प्रतिकूल परिस्थिती वर मात करून जिद्दीने ,धैर्याने positive दृष्टीकोन ठेवून जाणाऱ्या या दोघी आपल्याला खूप काही शिकवून जातात ………।
No comments:
Post a Comment